बेळगाव : गोकाक बस स्टँडवर थांबलेल्या बसमधून आज पहाटे डिझेल चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला असून जवळपास २०० लिटर डिझेल वाया गेलं आहे.
चिक्कोडी आगाराची बस बुधवारी रात्री गोकाक बस स्टँडवर थांबली होती. सकाळी ही बस बस स्टँडवरून सुटणार होती. दरम्यान पहाटे आसपास कोणी नसल्याचे पाहून चोरटयांनी बस मधील डिझेल काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दिवस उजाडल्याने चोरटयांनी तेथून धूम ठोकली. या गडबडीत चोरटे डिझेल भरलेली दोन कॅन व टाकीची पाईप तशीच सोडून गेले. त्यामुळे टाकीतील अंदाजे २०० लिटर डिझेल वाया गेलं आहे.