ऑनलाईन टीम/तरुण भारत
पुण्यात ससून रुग्णालयात (sasoon hospital) सोमवारी रात्री एकावर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. मोक्कांतर्गत येरवडा कारागृहात असणाऱ्या तुषार हंबीरवर (tushar hambir) ससून रुग्णालायत उपचार सुरू असतानाच हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी तिथे असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने हल्लेखोरांना रोखले. मोका गुन्हा दाखल असलेला आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या तुषार हंबीर याच्यावर हल्ला करण्यासाठी चौघे जण आले होते. दरम्यान, हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती असी की, तुषार हंबीर याच्यावर खूनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेला तुषार हंबीर हा येरवडा कारागृहात आहे. पण आजारी असल्यानं २५ ऑगस्टपासून ससून रुग्णालयात तो उपचार घेत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास तीन ते चार जणांनी कोयत्यासह ससून रुग्णालयात प्रवेश केला. त्यांनी हंबीरला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी हा हल्ला परतवून लावला. या झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपायुक्त सागर पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली असून आरोपींचा शोध घेत घेत आहेत.