पणजी : गोमंतकीय मराठी साहित्यिकांच्या व्याख्यानाचे ध्वनीचित्रमुद्रण हा प्रकल्प सांस्कृतिक वारसा मधील संवर्धनासाठी टाकलेले पाऊल आहे भाषा नव्हे तर भाषेमागील प्रेरणा आणि संवेदना या ध्वनीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येण्यासाठी हे ध्वनिचित्र मुद्रण अत्यंत आवश्यक आणि गरजेचे आहे, असे प्रतिपादन पद्मश्री विनायक खेडेकर यांनी केले. मराठी अध्ययन शाखा, शणै गोंयबाब भाषा आणि साहित्य महाशाळा आणि संत सोहिरोबानाथ आंबिये अध्यासन, अतिथी प्राध्यापक संशोधन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गोवा विद्यापीठाच्या परिषदगृहात आयोजित केलेल्या 25 गोमंतकीय मराठी साहित्यिकांच्या व्याख्यानाचे ध्वनीचित्रमुद्रण या अनोख्या प्रकल्पाच्या अनावरण सोहळ्dयात प्रमुख पाहुणे या नात्याने श्री. खेडेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू प्रा. डॉ. हरिलाल मेनन, प्रा. डॉ. सविता केरकर, शणै गोंयबाब भाषा आणि साहित्य महाशाळाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. के श्रीपाद भट, मराठी अध्ययन शाखेचे संचालक प्रा. विनय बापट, या प्रकल्पाचे संयोजक, संपादक प्रा. विनय मडगावकर उपस्थित होते. सदर प्रकल्प संशोधकांसाठी तज्ञासाठी फायदेशीर ठरेल. संस्कृतीत ध्वनी अत्यंत महत्त्वाची आहे. मौखिक परंपरेमध्ये ध्वनी महत्त्वाची भूमिका बजावतो. संस्कृतीत भाषेपेक्षा ध्वनीला जास्त महत्व दिले गेले आहे, असे मत खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
विविध शाळा, महाविद्यालये गोमंतकीय मराठी साहित्यिकांच्या व्याख्यानाचे ध्वनीचित्र मुद्रणाबद्दल विचारत होते. जे कुणी यात अध्ययन करत आहेत त्यांच्यासाठी हा जणू खजिनाच आहे. अभ्यासासाठी हा प्रकल्प उपलब्ध असल्याचे कुलगुरू मेनन यांनी सांगितले. यावेळी गोवा विद्यापीठातील तत्कालीन मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी गाऊन सादर केलेल्या मराठी भाषा गौरव गीताच्या व्हिडिओचे उद्घाटन कुलगुरू प्रा. डॉ. हरिलाल मेनन यांच्याहस्ते करण्यात आले. स्वा.सै.कै. गजानन रायकर, अॅड.पांडुरंग नागवेकर, गोपाळराव मयेकर, जयराम कामत, अऊण हेबळेकर, विनायक खेडेकर, मेघना कुऊंदवाडकर, चित्रसेन शबाब, प्रा. रामदास केळकर, मनोहर कोरगावकर, दासू शिरोडकर, विजय कापडी, विजयकुमार नाईक, प्रा. उल्हास प्रभुदेसाई, चंद्रकांत जाधव, रेखा ठाकूर, राधा भावे, बाळ सप्रे, शरद दळवी, गिरीजा मुरगोडी, अनुजा जोशी, डॉ. विठ्ठल ठाकूर, प्रमोद मसुरकर, प्रा. नारायण महाले आणि मिलन तळावलीकर या 25 गोमंतकीय मराठी साहित्यिकांच्या व्याख्यानाचे ध्वनीचित्रमुद्रणाचे उद्घाटन पद्मश्री विनायक खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनामुळे हा प्रकल्प दोन वर्षे प्रलंबित होता. परंतु आता मराठी विभाग ब्रयापैकी कार्यान्वित झाला आहे.याशिवाय अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत सदर प्रकल्प 2018 मध्ये सुरू करण्यात आला होता यात 25ऑडिओ व्याख्याने आहेत यांची डीव्हीडी उपलब्ध आहेत अशी माहिती प्रा. सविता केरकर यांनी दिली. यावेळी शणै गोंयबाब भाषा आणि साहित्य महाशाळाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. श्रीपाद भट यांचे भाषण झाले. यावेळी कुलगुरू मेनन यांच्या हस्ते विनायक खेडेकर यांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गोमंत भूमी ही साहित्यिकांची भूमी आहे या भूमीची परंपरा सर्वात पर्यंत पोहोचविणे हे आमचे कर्तव्य आहे आमची परंपरा आमचे स्वत्व जर जपायचं असेल तर मराठी भाषेच्या मातीच्या मूळाला खतपाणी घालणे गरजेचे आहे असे विनय बापट यांनी स्वागतपर भाषणात सांगितले. प्रास्ताविक विनय मडगावकर यांनी केले तर अतिथींचा परिचय चिन्मय घैसास यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदिका हिने केले तर आभार पूर्वा पंडित यांनी मानले.