केस सुंदर आणि लांब होण्यासाठी त्यावर बरीच मेहनत घेतली जाते. त्यासाठी महागड्या ट्रीटमेंट्स आणि शाम्पू ,सिरम देखील वापरतो. पण बऱ्याचदा इतकी मेहनत घेऊनही केसांच्या अनेक समस्या जाणवू लागतात.पण केस धुतल्यानंतर नकळतपणे आपल्याकडून छोट्या छोट्या चुका होतात, ज्या केसगळती किंवा इतर समस्यांसाठी कारणीभूत ठरतात.त्यामुळे केस धुतल्यानंतरही त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
केस धुतल्यानांतर ते तुटण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, ओल्या केसात कंगवा फिरवल्यास ते गळू शकतात. म्हणूनच केस नीट कोरडे केल्यावरच केस विंचरा.
ओल्या केसांना कंघी करायची असेल तर मोठ्या दाताचा कंगवा वापरा.
ओले केस बांधणे टाळा, लांब केस बांधल्याने ते अनेक वेळा तुटतात.
केस सेट करण्यासाठी अनेक संसाधने आहेत, त्यापैकी बहुतेक फक्त ओल्या केसांमध्ये वापरली जातात, परंतु शक्य तितक्या ओल्या केसांवर हेअर स्प्रे लावणे टाळा.
केस हलकेसे वाळल्यानंतर त्यावर सिरम लावावे.
जर तुम्हाला ओल्या केसांना तेल लावायचे असेल,तर अगदी हळुवार पद्धतीने मसाज करावा. शक्यतो बदामाचे तेल वापरावे. त्यामुळे ते स्केलमध्ये जाते परंतु तेलाचा थर तयार करत नाही.
Previous Articleसध्याचे सरकार चोरांचे…याचे काही खरे नाही- प्रकाश आंबेडकर
Related Posts
Add A Comment