विजय कुमार सिन्हांनी सोडले पद
वृत्तसंस्था/ पाटणा
राजदचे नेते अवधबिहारी चौधरी यांची बिहार विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. बिहारमध्ये आघाडीमधील बदलाच्या पार्श्वभूमीवर विजय कुमार सिन्हा यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. सिन्हा यांच्या विरोधात महाआघाडी सरकारने अविश्वास प्रस्ताव मांडला होता. चालू महिन्याच्या प्रारंभी बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून राजदचा पाठिंबा मिळविला होता. त्यानंतर महाआघाडी सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. या महाआघाडीत काँग्रेस, राजद, संजद, सीपीआयएमएल (एल), माकप अन् भाकपचा समावेश आहे.