बेळगाव
इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव आणि भरतेश पीयू कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी शारीरिक स्वच्छतेवर जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. सविता कद्दू यांनी यावेळी मार्गदर्शन केले. स्वच्छता उपकरणांचा वापर आणि व्यायामाचे फायदे याबद्दल त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी सुलोचना आय हॉस्पिटलचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा शालिनी चौगुले, सचिव पुष्पांजली मुक्कण्णावर, स्वाती उपाध्ये, प्राचार्या सुनीता देशपांडे आदी उपस्थित होत्या.