Balasaheb Thorat : मी पक्षावर कधीही नाराज नव्हतो, नाराज नाही. पक्षामध्ये आणि माझ्यामध्ये पत्रव्यवहार झाला असेल तर ती नेहमीची बाब आहे. प्रत्येक पक्षात पत्रव्यवहार होत असतात. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला होता. ते नाराज असल्याचे बोलले जात होते. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्यात विसंवाद असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. आज कॉंग्रेसच्या बैठकिला दोन्ही नेते उपस्थित होते. त्यांच्या नाराजीवर आज प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी नाराज नसल्याचे मोठ वक्तव्य केलं आहे.आज कॉंग्रेसची बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटाबद्दल विचारल्यानंतर ते म्हणाले की, शरद पवारांना विचारून शपथविधी झाला असता तर सरकार पडले नसते. तस काहीही झाले असाव अस मला वाटत नाही. विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी शरद पवारांचा मुद्दा उपस्थित करून वाद निर्माण करण्याचे काम भाजप करत आहेत. सातत्याने दिशाभूल करण्याचे काम भाजप करत आहे.
बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक ज्योतिर्लिंग पुण्यात आहे. मात्र भीमाशंकराचं सहावं ज्योतिर्लिंग आसासमध्ये असल्याचा दावा आसाम सरकारने केला आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ज्योर्तिलींगाची एक पूर्वांपार परंपरा आहे, जी पूर्वीच्या ग्रंथामध्ये दिसते. आद्य शकाराचार्यां पासून सुरु झालेली ही परंपरा आहे. त्याच्या बांधनीची एक वेगळी वैशिष्ट्ये आहेत. आजकाल महाराष्ट्रातून बरच काही बाहेर जातआहे. आसाम सरकारचा दावा आमच्या श्रध्देला धक्का लावणारा आहे. महाराष्ट्र सरकारनं या प्रस्नावर उत्तर द्यायला हवं. इतिहासाबाबत वाद निर्माण करायचे हे भाजपाचं काम असल्याची टीका ही त्यांनी केली.
Previous ArticleKolhapur : 10 वी, 12 वी परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू
Next Article रविकांत तुपकरांसह 25 जणांना जामीन मंजूर
Related Posts
Add A Comment