Balasaheb Thorat : मुंबई महापालिकेसह राज्याच्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी अमित शहा जोरदार प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीगाटी सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर भाजप नेत्यांच्या राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसेमध्ये युती होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रसेच नेते बाळासाहेब थोरात यांनी भाष्य़ केलं आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, आगामी काळात भाजप आणि मनसे यांच्यात युती होऊ शकते. पण आम्ही ज्या राज ठाकरेंना ऐकले आणि पाहिले आहे तो लढाऊबाणा आताच्या राज ठाकरेंमध्ये राहिलेला नाही,असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
Trending
- गृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार
- मध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’
- हरिभजनाविण काळ घालवू नको रे
- रिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी
- महिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा
- 2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली
- ‘असूर 2’चा ट्रेलर प्रदर्शित
- गुवाहाटीत भीषण दुर्घटना, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू