हैदराबादमध्ये मोठा बंदोबस्त
वृत्तसंस्था/ हैदराबाद
वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी आमदार राजा सिंह यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या विरोधात शनिवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. यामुळे शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्रीराम युवा सेनेने या बंदचे आवाहन केले होते. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेगम बाजार, गोशामहल, मंगलहट आणि आसपासच्या भागांमधील सुरक्षा वाढविली. बेगम बाजारमधील व्यापाऱयांनी स्वतःची दुकाने बंद ठेवली होती.
चेरलापल्ली मध्यवर्ती तुरुंगात कैदेत असलेले राजा सिंह यांना सुरक्षेच्या कारणास्तव दुसऱया बरॅकमध्ये हलविण्यात आले आहे. तुरुंगात आमदाराला भेटण्यासाठी येत असलेल्या सर्व लोकांची चौकशी करण्यात येत आहे. राजा सिंह यांना 25 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.