गणेशभक्तांचा अपूर्व उत्साह : पारंपरिक ढोलताशा, सनईवादनाला गणेशभक्तांची पसंती; सायंकाळी पावसामुळे मात्र हिरमोड
प्रतिनिधी /बेळगाव
घरोघरी आणि सार्वजनिक मंडपात गणरायांचे बुधवारी आगमन झाले आणि अवघे शहर चैतन्याने सळसळत राहिले. दोन वर्षाच्या खंडाची कसर गणेशभक्तांनी यंदा भरून काढली. परिणामी यंदाच्या गणरायांच्या आगमनाचा उत्साह अपूर्व असाच होता. मंडपात कार्यकर्त्यांचा आणि घरामध्ये बालचमू व तरुणाईचा जल्लोष लक्षवेधी ठरला. यंदाच्या गणरायांच्या आगमनावेळी पारंपरिक अशा ढोलताशा तसेच सनईवादनाला गणेशभक्तांनी पसंती दिल्याचे दिसून आले.
सर्वांचा आवडता गणराया अखेर बुधवारी घरांमध्ये तसेच मंडपांमध्ये विराजमान झाला. मागील आठवडाभरापासून गणरायाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. बुधवारी सकाळपासून गणेशमूर्ती वाजत गाजत घरी आणल्या जात होत्या. त्यामुळे मूर्तीकारांच्या कार्यशाळेपासून भाविकांच्या घरांपर्यंत या मिरवणुका काढल्या जात होत्या. यामुळे दिवसभर शहरातील प्रमुख रस्ते गर्दीने फुलले होते. किर्लोस्कर रोड, खडेबाजार, मारुती गल्ली, गणपत गल्ली या परिसरात भाविकांची गर्दी होती. शहरासोबतच उपनगरांमध्ये गणेशाच्या आगमनाचा जल्लोष होता. शहापूर वडगाव, अनगोळ, टिळकवाडी तसेच शहराच्या विविध भागात गणराया घरी आणले जात होते.
वाहनांमधून गणराय घरी
घरातील वडीलमंडळी बाप्पाची मूर्ती डोक्मयावर अथवा हातामध्ये घेऊन घरी जात होते. तर बऱयाच जणांनी यावषी वाहनांमधून गणरायाला घरी घेऊन जाणे पसंत केले. दुचाकी, चार चाकी, रिक्षा, ट्रक्टर, बैलगाडी मधून श्रीमूर्ती आणण्यात येत होत्या. केवळ मंडळेच नाहीत तर बीएसएनएल, हेस्कॉम, महानगरपालिका, परिवहन मंडळ, कॅन्टोन्मेंट, सिव्हील हॉस्पिटल, रेल्वे कर्मचाऱयांनीही गणेश मूर्तीची प्रति÷ापना केली.
आकर्षक फुलांची सजावट
महिलांनी घराबरोबरच सार्वजनिक मंडपांसमोर भव्य रांगोळय़ा घातल्या होत्या. तसेच फुलांची आकर्षक अशी आरास करण्यात आली होती. सार्वजनिक मंडळांच्या श्रीमूर्तींसाठी ट्रक्टर, ट्रक व ट्रॉलीमध्ये नयनरम्य सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
बँडवाल्यांची चलती
यावषी डॉल्बिवर निर्बंध आल्याने पारंपरिक वाद्य व बँड यांच्या तालात गणरायांचे आगमन झाले. मूर्तीकाराच्या कार्यशाळेपासून घरापर्यंतचे अंतर यावर बँडवाल्यांचे भाडे ठरत होते. हौशी गणेशभक्त बँण्ड, सनईच्या तालावर गणेश मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी इच्छुक असल्यामुळे बँडवाले मिळत नव्हते. त्यामुळे बँडवाल्यांची गणेशोत्सवात चलती दिसून आली. याचबरोबर पौरोहित्य करण्यासाठी भटजींची धावपळ सुरू होती.
सायंकाळी पावसामुळे मात्र हिरमोड
सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते श्रीमूर्ती आणण्यासाठी सायंकाळी 5 नंतर बाहेर पडत होते. परंतु सायंकाळी 6 च्या सुमारास पावसाची रिमझिम सुरू झाली. यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. प्लास्टिकच्या पिशव्या झाकून गणेश मूर्ती मंडपापर्यंत आणाव्या लागल्या. श्रीमूर्ती आणण्यासाठी मंडळांनी ढोल-ताशासह जय्यत तयारी केली होती. परंतु पावसाचा व्यत्यय आल्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. रात्री उशीरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती.
दरवषीच्या तुलनेत यावषी फटाक्मयांच्या आतषबाजीवर नियंत्रण आल्याचे दिसून आले. प्रशासनाकडून वारंवार प्रदुषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जागृती केली जात होती. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याचा विचार करत फटाक्मयांच्या आतषबाजीवर नियंत्रण आणले आहे. यावषी अत्यंत कमी प्रमाणात फटाक्मयांची आतषबाजी करण्यात आली.
पारंपरिक पोषाख व वाद्याला पसंती
यावषीच्या गणेशोत्सवात पारंपरिक पोषाख व वाद्य हे विशेष ठरले. मुलांनी कुर्ता पायजमा तर महिला मराठमोळय़ा पोषाखात दिसून आल्या. याचबरोबर पारंपरिक वाद्यांवर तरुणाई थिरकत होती. ढोल ताशासह सनईच्या सुरांमध्ये बाप्पांचे आगमन झाले. टीपरीच्या तालावर तरुण मंडळी ठिकठिकाणी थिरकत होती. यामुळे यावषीच्या गणेशोत्सवात पारंपरिक पोषाख व वाद्यांचे आकर्षण ठरले.
निलगार गणपतीचे आजपासून दर्शन
नवसाला पावणाऱया संकेश्वर येथील निलगार गणेशाची हेद्दूरशेट्टी घराण्यात बुधवारी सायंकाळी 6 वाजता विधीवत प्रति÷ापना करण्यात आली. भाविकांसाठी निलगार गणपतीचे दर्शन 1 सप्टेंबरपासून घेता येणार असल्याची माहिती हेद्दूरशेट्टी परिवाराने दिली आहे.
अनगोळ येथील रिक्षा चालकांची मोफत सेवा

प्रतिवर्षाप्रमाणे अनगोळ येथील रिक्षाचालकांनी गणेश भक्तांना मोफत सेवा दिली. बरेच गणेशभक्त डोक्मयावरून अथवा हातातून बाप्पांची मूर्ती घरी घेऊन जातात. त्यामुळे अनगोळमधील काही रिक्षाचालक मागील अनेक वर्षांपासून मोफत सेवा देत आहेत. मूर्तीकारापासून ते भाविकांच्या घरापर्यंत रिक्षाने श्रीमूर्ती नेली जाते. या उपक्रमाचे सर्व भक्तांमधून कौतुक होत आहे.