Beauty Blender Cleaning : मेकअप करताना त्याचे ब्रश असणे खूप गरजेचे असते. तुम्ही ब्रश शिवाय मेकअप केला तर तो चेहऱ्याला एकसारखा बसत नाही. यासाठी वेगवेगळे ब्रश आपल्याकडे असणं गरजेचे आहे. मेकअप करत असताना सगळ्यात तो मेकअप व्यवस्थित बसून पसरला नाही पाहिजे याची काळजी घ्या. यासाठी विशेषत: फौंडेशन लावत असताना ब्युटी ब्लेंडरचा वापर करा. याचे कारण म्हणजे आपण हाताने फौंडेशन लावले तर काही तासाने चेहरा पॅची दिसायला लागतो. आणि ते खूपचं खराब दिसतं. यासाठी ब्लेंडरचा वापर योग्य तो करा हे ब्लेंडर कसे वापरावे आणि वापरून झाल्यावर ते स्वच्छ कसे करावे हे आज जाणून घेऊया.
ब्युटी ब्लेंडर कसे वापरावे
कोणतीही क्रिम चेहऱ्याला लावत असताना ती चेहऱ्याला एकसाऱखी लागावी यासाठी आपण ब्युटी ब्लेंडर वापरतो. ब्लेंडर वापरत असताना तो आधी पाण्यात बुडवा. त्यातील सगळे पाणी काढून टाका मग त्याचा वापर करा. तुम्ही जेव्हा अशापध्दतीने ब्लेंडरचा वापर करता त्यावेळी क्रिम छान चेहऱ्याला बसते. पाण्यात ब्लेंडर बुडवल्याने तो स्पंजी देखील होतो. मेकअपसाठी वेगवेगळे ब्लेंडर आणि ब्रश वापरा.
ब्युटी ब्लेंडर स्वच्छ करा
ब्युटी ब्लेंडरचा वापर झाल्यानंतर तो स्वच्छ कसा करायचा असा अनेकांना प्रश्न पडतो. काहीजणी साबण किंवा पावडरचा वापर करतात. मात्र कोणतेही ब्रश किंवा ब्लेंंडर क्लिन करण्यासाठी ब्रश क्लिनरचा वापर करा. यासाठी एक ग्लास पाणी घ्या त्यात ब्रश क्लिनरचे चार ते पाच ते थेंब घाला आणि ब्लेंडर चोळून-चोळून स्वच्छ धुऊन घ्या. अशाप्रकारे तुम्ही तुमचा ब्रश आणि ब्लेंडर स्वच्छ करू शकता.
Previous Articleजिल्हय़ात अंगणवाडी केंद्रांतून राष्ट्रीय पोषण अभियान
Next Article अन् इमारत पाडण्यासाठी दाखल झाले जेसीबी
Related Posts
Add A Comment