Kolhalur : मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात मेंढोली येथील नानू जोतीबा कोकीतकर (वय 80) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी ही घटना घडली असून शनिवारी सकाळी कोकीतकर यांचा मृतदेह त्यांच्या काळवाट नावाच्या शेतातील घरात आढळून आला. त्यांच्या मृतदेहाभोवती मधमाश्या घोंगावत असल्याचे आढळून आले. दरम्यान या हल्ल्यात कोकीतकर यांच्या सहा शेळ्या ही जखमी झाल्या आहेत.
हेही वाचा- विकास आघडीच्या अभ्यासमंडळाची यादी अंतिम
नियमितपणे कोकीतकर शेळ्या चारण्यासाठी जातात. तर प्रत्येक शुक्रवारी आजरा आठवडा बाजारादिवशी ते बाजारातून आल्यानंतर शेळ्या चारून शेतातील घरीच वस्तीला थांबत होते. त्याप्रमाणे ते शुक्रवार दि. 21 रोजी बाजारातून शेतात गेले. पण नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ते घरी लवकर आले नसल्यामुळे कुटुंबिय शेताकडे गेले असता शेतातील घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. ऐन दिवाळसणात वयोवृद्ध शेतकऱ्यांचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे मेंढोलीसह पंचक्रोशी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
Previous Articleराज्यातील पोलीस भरती लवकरच
Next Article शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष
Related Posts
Add A Comment