ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यपाल होणं म्हणजे दु:खच दु:ख आहे, यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. कधी कधी मला वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे, अशी खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी व्यक्त केली आहे.
जैन समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना कोश्यारी म्हणाले, मी आता 80 वर्षांचा झालो, त्यामुळे मी आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत नाही. मात्र, जेव्हा सन्यांसी आणि मुमुक्षरत्न राजभवनात येतात, तेव्हा मला आनंद होतो. कधी कधी मला वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख आहे, यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही.
अधिक वाचा : पुण्यात CBSE बोर्डाच्या तीन शाळा बोगस
माझे सरकारला आवाहन आहे की, पर्यटन मंत्रालयसोबतच तीर्थ मंत्रालय देखील व्हावं. कारण सर्वच मुमुक्ष, मुनी, राज्यपाल बनू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज व्हावे, भगतसिंह, चंद्रशेखर, लोकमान्य टिळक व्हावे अशी सर्वांची इच्छा असते, मात्र ते आपल्या घरात नाही तर दुसऱयांच्या घरात व्हावे अशी लोकांची भावना असते, असेही ते म्हणाले.