केवळ भक्तीमुळे शिवाजीनगर येथील युवकाचा उपक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
केवळ भक्तीमुळे शिवाजीनगर दुसरी गल्ली येथील प्रसाद पुंडलिक हुंदरे या युवकाने बेळगाव ते जोतिबा असा 125 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे. केवळ जोतिबाच्या भक्तीपोटी त्याने हा प्रवास तिसऱयांदा केला आहे. कोल्हापूर येथील जोतिबा डोंगरावर भरणाऱया यात्रेसाठी त्याने हा प्रवास एक दिवसात केला आहे.
प्रसादने गुरुवारी पहाटे 5.30 वाजता बेळगाव येथून या प्रवासाला सुरुवात केली होती. साधारण 4 वाजता तो जोतिबा डोंगरावर पोहोचला. दरवषी बेळगाव येथून मानाची सासनकाठी जोतिबाला रवाना होते. यात्रा संपल्यानंतर सासनकाठीसमवेत हा युवक बेळगावला परतणार आहे. आजचे युवक केवळ फेसबुक आणि क्हॉट्स ऍपवर मग्न असतात. असा युवकांना हा प्रवास आरोग्याच्या दृष्टिकोनातून आदर्श ठरणारा आहे. शिवाय प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाबरोबर शरीर सदृढीसाठी आठवडय़ातून एकदातरी सायकलचा प्रवास करावा, असा संदेशदेखील त्याने दिला आहे. जोतिबा डोंगरचा खडतर प्रवास करून तो तेथे पोहोचला आहे. यात्रा समाप्तीनंतर सासनकाठीसमवेत तो परतीच्या प्रवासाला निघणार आहे.