बेसन म्हटलं की जिभेला पाणी सुटतं. गरम-गरम क़डक भाकरी, त्यावर कांदा, दही, खरडा, शेगदाणा चटणी आणि गरम पिटलं वाह!.. अस आपोआपच तोंडून वाक्य निघत. खरतर बेसनचे सगळेच पदार्थ छान लागतात. बेसन लाडू, बेसन गोड वड्या, पिठले तर दोन ते तीन प्रकारे बनवता येते. असे अनेक पदार्थ आहेत जे या पीठापासून बनवता येतात. आज मी तुम्हाला बेसनची वडी कशी करायची याची रेसापी सांगणार आहे. जी कराय़ला एकदम सोपी आहे. आणि टेस्टही खूप छान लागते. चला तर जाणून घेऊया.
साहित्य
बेसन दोन वाट्या
लसूण १० ते १२ कुड्या (लसून जादा वापरा)
आद्रक – अर्धा इंच
मिरची- ६ ते ७ (तिखट जादा आवडत असेल तर जादा वापरू शकता)
कडीपत्ता- १० ते १२ पाने
कोथंबिर- आवडीनुसार
जिरे- १ चमचा
हिंग- अर्धा चमचा
हळद- अर्धा चमचा
चवीनुसार मीठ
कृती
सुरुवातीला लसून, मिरची, आद्रक,जिरे, कडीपत्ता, कोथंबिर याचे वाटण करून घ्या. आता कढईमध्ये दोन चमचे तेल टाका. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये ते वाटण घाला. हे मिश्रण चांगेल भाजून घ्या. त्यात आता हिंग घाला. आद्रक, लसून, मिरचीचा वास जाईपर्यंत चांगले भाजून घ्या. त्यात आता मीठ घाला. त्यानंतर पाणी घाला. पाण्याला चांगली उकळी आली की बेसनपीठ थोडं-थोडं अॅड करत चांगलं घोटून घ्या. मिश्रण एकजीव झाल्यावर पाच मिनिट झाकण ठेवा. आता गॅस बंद करा. आता ताटाला तेल लावून घ्या. त्यात तयार झालेले मिश्रण पसरवून थापून घ्या. मिश्रण पाच मिनिट थंड होवू द्या. यानंतर त्याच्या चौकोनी किंवा शंकरपाळी आकाराच्या वड्या पाडून घ्या. परत त्यावर ओलं खोबर आणि कोथंबिर पसरवून घ्या आणि थापून घ्या. आता हळूच वडी काढून घ्या. आणि सर्व्ह करा.
टीप- बेसन वडी करत असताना पाण्याचे प्रमाण बिघडले की वडी बिघडू शकते. यासाठी जेवढ पीठ घ्याल तेवढचं पाणी घाला. वडी छान होते.
Previous Articleमहाबळेश्वरमध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न
Next Article पोखरण अणूचाचणी तंत्रज्ञ संजय चव्हाण यांचे निधन
Related Posts
Add A Comment