वार्ताहर /मडकई
महालक्ष्मी बांदोडा येथील श्री महालक्ष्मी मंदिरात वार्षिक भजनी रसामृत सप्ताहाला काल सोमवारी दुपारी सुरुवात झाली. निवृत्त उपअधीक्षक अभियंते दिलीप माधव ढवळीकर यांच्याहस्ते पारंपारिक समई प्रज्वलीत करून या चोवीस तासांच्या अखंड भजनी सप्ताहाला सुरुवात करण्यात आली.
पुरोहित अरुण देऊसकर व समीर दाते यांच्या अधिपत्याखाली दिलीप ढवळीकर यांच्याहस्ते धार्मिक विधी पार पडले. सामुहिक गाऱहाणे घातल्यानंतर ‘जय जय रामकृष्ण हरी’ या गजराने सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला. गायक श्रीपाद नाईक गावणेकर, लक्ष्मीकांत नाईक व सचिन दाते यांना हार्मोनियमवर विनायक च्यारी तर पखवाजवर निश्चय अतुल नाईक यांनी साथसंगत केली. यावेळी विजमंत्री आमदार सुदिन ढवळीकर, म. गो. अध्यक्ष माजी मंत्री दीपक ढवळीकर, महालक्ष्मी देवस्थान समितीचे अध्यक्ष हर्षद कामत, माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथील ढवळीकर, प्रसाद गावंकर, सोनू गावडे, जानू नाईक, हार्मोनियम वादक कुष्टा गावडे, दामोदर मुळवी, सप्रेश मुळवी, अरूण काळे, शंभूनाथ केरकर, पराग नागेशकर, सोनू नाईक तसेच अन्य भक्त मंडळी उपस्थित होती.
त्यानंतर रात्री अनेक भजनी पथकाच्या कलाकारांनी अभंग सादर केले. आज मंगळवार दि. 9 रोजी दुपारी दिंडीने सप्ताहाची सांगता करण्यात येतील.