वृत्तसंस्था /अँटाल्या (तुर्की)
2022 च्या बिली जीन किंग चषक सांघिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत आशिया-ओसेनिया गट-1 मधील झालेल्या लढतीत जपानने भारताचा 3-0 अशा फरकाने एकतर्फी पराभव केला.
या स्पर्धेतील मंगळवारच्या तिन्ही लढती एकतर्फी झाल्या. चीनने न्यूझीलंडचा 3-0, जपानने भारताचा 3-0, दक्षिण कोरियाने इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. पहिल्या एकेरी सामन्यात जपानचा युकी नायतोने भारताच्या ऋतुजा भोसलेचा 6-0, 6-4, दुसऱया एकेरीत जपानच्या मेई होनतामाने भारताच्या अंकिता रैनाचा 6-4, 6-4, त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात जपानच्या अवोयामा आणि शिबाहारा या जोडीने भारताच्या सौज्यन्या आणि रिया भाटिया यांचा 6-0, 6-4 असा पराभव केला.