स्वत:चे वडिल अन् मुलाच्या रक्ताचा करतो वापर
अमेरिकेत टेक कंपनी चालविणारे ब्रायन जॉन्सन पूर्ण जगात बायोहॅकर या नावाने ओळखले जातात. कारण त्यांनी वृद्ध दिसू नये म्हणून लाखो रुपये खर्च पेले आहेत. याकरता त्यांनी एक नवा प्रयोग केला आहे. या प्रयोगानुसरा ते स्वत:च्या 17 वर्षीय मुलाच्या रक्ताचा वापर करत स्वत:च्या शरीरातील रक्त बदलत आहेत. तरुण मुलाच्या रक्तातील प्लाझ्माद्वारे ब्रायन हे तरुण दिसण्याचा प्रयोग करत आहेत.
ब्रायन हे स्वत:चे 70 वर्षीय वडिल रिचर्ड आणि 17 वर्षीय मुलगा टॅल्मेजचे रक्त स्वत:च्या शरीरात चढवत आहेत. टेक्सासच्या क्लीनिकमध्ये हे तिघेही ट्रान्सफ्यूजनच्या प्रक्रियेला सामोरे गेले असून यात सुमारे 1 लीटर रक्त वृद्ध रिचर्ड आणि किशोरवयीन टॅल्मेजचे घेण्यात आले.

स्वत:चे बायोलॉजिकल क्लॉक 8 वर्षे मागे केले असून याचा प्रभाव माझी फुफ्फुसे, त्वचा आणि अन्य अवयवांवर दिसून येत असल्याचा दावा ब्रायन जॉन्सन यांनी केला आहे. त्यांच्या ब्ल्यूप्रिंट नावाच्या रिव्हर्स एजिंग प्रोजेक्टमध्ये आणखी बरेच काही आहे, परंतु सध्या चर्चेत आहे तो त्यांचा ब्लड ट्रान्सफ्यूजनचा प्रयोग.
पिता अन् पुत्राकडून मिळालेल्या रक्ताला प्लाझ्मा, प्लेटलेट्स, रेड आणि व्हाइट ब्लड सेल्समध्ये विभागण्यात आले आणि नंतर ते ब्रायन यांच्या शरीरात इंजेक्ट करण्यात आले. जेणेकरून त्यांच्या जुन्या रक्ताला ताजे करता येऊ शकेल. यामुळे सेल्स रिपेयर होत त्यांची एजिंग प्रक्रिया मंदावू शकेल.
आपले वय 25 वर्षांपेक्षा अधिक दिसू नये अशी ब्रायन यांची इच्छा आहे. स्वत:ला केवळ युवावस्थेत कायम राखण्यासाठी त्यांनी 30 डॉक्टरांचे पथक नेमले असून हे पथक त्यांच्या शारीरिक हालचालींवर देखरेख ठेवून असते. ब्रायन यांच्या अवयवांची एजिंग प्रोसेस यामुळे रिव्हर्स होत असल्याचे सांगण्यात येते. वय आणि आयुर्मान वाढविणाऱ्या संशोधनाच्या मदतीने डॉक्टर्स त्यांच्यावर उपचार करतात आणि निष्कर्षांचे विश्लेषण करतात.
काही वर्षांपूर्वीच त्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे. स्वत:चे शरीर 18 वर्षीय मुलासारखे करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. यारता 2 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 16 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्यांनी खर्च केली आहे.