तांदूळवाडी बैलगाडी शर्यतीदरम्यानची घटना,
वार्ताहर.\एकंबे
तांदुळवाडी (ता. कोरेगाव) येथे शुक्रवारी झालेल्या बैलगाडी शर्यतीदरम्यान दुपारी चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने बैलगाडी थेट कृष्णा नदीत कोसळली. या अपघातात दोन्ही बैलांचा दुर्देवी मृत्यु झाला. याप्रकरणी कोणत्याही प्रकारची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात रात्री उा†शरापर्यंत झालेली नव्हती.
तांदुळवाडीत शर्यती दरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने बैलगाडी जोरात धावू लागली. श्री कोल्हेश्वर मां†दरासमोर बैलगाडी अडा†वण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने अचानक उडी मारल्याने बैल उधळले आा†ण गाडी फरफटत जाऊन कृष्णा नदीत कोसळली. पाण्यात बुडून दोन्ही बैलांचा मृत्यु झाला. या अपघातानंतर आयोजकांनी शर्यत बंद केली. दरम्यान, याबाबतचा सा†वस्तर तपशील समजू शकला नाही. पोलीस ठाण्यात चौकशी केली असता, कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नव्हती.