ऑनलाईन टीम/तरुण भारत
बिझनेस आयकॉन्स आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विटरवर दररोज सक्रिय राहत प्रत्येक गोष्टींवर करडी नजर असल्याचं दाखवून दिलं आहे. हर घर तिरंगा माध्यमातून देशातील 25 कोटी कुटुंबाने आपल्या घरांवर तिरंगा झेंडा फडकवला. असाच एक फोटो बिझनेस आयकॉन आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत या फोटोला पसंती दिली. हा फोटो कोल्हापूर जिल्ह्यातील मुळचे पन्हाळा (Panhala) तालुक्यातील पुणाळ इथल्या वृद्ध दाम्पत्याचा आहे. ते सध्या उचगाव (Uchgaon) येथे राहतात. उचगाव येथे राहणाऱ्या घरावर हे दाम्पत्य तिरंगा लावतानाचा फोटो व्हायरल झाला होता.
आनंद महिंद्रा यांना हा फोटो इतका आवडला की, त्यानंतर त्यांनी हा फोटो ट्विट करत हा जोडप्यांचा अभिनंदन केले. सध्या उचगाव येथे राहणारे हिंदुराव दत्तू पाटील आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणी पाटील हे घरावर तिरंगा लावताना फोटो काढण्यात आला होता. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बिझनेस आयकॉन आनंद महिंद्रा यांनी हा फोटो ट्विट केला आहे. पाटील हे छत्रपती संभाजीराजे यांचे अंगरक ज्योत्याजी केसरकर यांचे वंशज असल्याचे सांगितले जाते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर असे अनेक फोटो समोर आले आहेत, जे ‘हर घर तिरंगा’ मोहिमेबद्दल लोकांचा उत्साह दाखवत आहेत. समोर आलेल्या अशाच एका फोटोमध्ये एक महिला लोखंडी टाकीवर उभी राहून तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर एक वृद्ध व्यक्ती टाकी सांभाळून या महिलेच्या सुरक्षेची काळजी घेत आहे. “स्वातंत्र्यदिनी एवढा गोंधळ का” असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर म्हणून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक छायाचित्र शेअर केले आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या छायाचित्रात, लोखंडी टाकीशेजारी एक छोटासा हिरवा स्टूल आहे, ज्यावरून ती महिला लोखंडी टाकीवर चढली. या वयोवृद्ध जोडप्याने राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी किती मेहनत घेतली हे फोटोवरून दिसत आहे.