बेळगाव : सहारा फौंडेशन व जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी यांच्यावतीने खंजर गल्ली येथील शाळा क्र. 1 मधून मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू चिकित्सा शिबिर घेण्यात आले. शिबिरात 580 जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्या सर्वांना मोफत चष्मे देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. 90 जणांना मोतीबिंदू आढळला असून ती शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहे. या शिवाय 360 जणांची बीपी, शुगर तपासण्यात आली. शिबिरात अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब व त्यामुळे डोळय़ांची समस्या निर्माण झाल्याचे आढळून आले. या सर्वांना सहाराच्या उज्वलनगर येथील क्लिनिकमध्ये मोफत उपचार घेण्यास सांगण्यात आले.
Previous Articleफनफेअर फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन
Next Article अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा आदेश
Related Posts
Add A Comment