बेळगाव- प्रतापगड येथील अफजलखानाच्या कबरीवर अनधिकृत करण्यात आलेले बांधकाम गुरुवारी महाराष्ट्र सरकारकडून पाडविण्यात आले. यानिमित्ताने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे बेळगाव मध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नागरिकांना पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.आरती म्हणून त्यानंतर आनंद साजरा करण्यात आला.परिसरातील नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी व जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या आदेशानुसार कार्यक्रम झाला.
यावेळी तालुका प्रमुख परशराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लापा पाटील,किरण बाडवांनाचे, अंकुश केसरकर, भास्कर पाटील, महेश जांगळे, शुभम मोरे, अमोल केसरकर, गजानन निलजकर, हेमंत जांगळे, करण पाटील, भाऊराव कोलेकर,किशोर मजुकर, नितीन कुलकर्णी, सागर पवार, सुशांत जांगळे, कपिल कडोलकर उपस्थित होते.
Related Posts
Add A Comment