डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ एेतिहासिक विद्यापीठ आहे. विद्यापीठासाठी संघर्ष झाले.डाॅ. बाबासाहेबांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. मला या विद्यापीठाच्या निर्मितीचा कालखंड आठवतोय.त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि घटनेच्या माध्यमातून संसदीय लोकशाही मजबूत करण्याची मोठी कामगिरी केली. त्यांचा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यापीठाशी मोठा संबंध होता,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. मराठवाडा विद्यापीठाचा 62 व्या दीक्षांत समारंभात हा सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांना डी.लिट प्रदान करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर होते.
शरद पवार यांना डी.लिट देण्यापूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी डॉक्यूमेंट्री दाखवण्यात आली.ही डॉक्यूमेंट्री दाखवताना शरद पवार यांचं नामांतर विस्तार आंदोलनातील योगदान अधोरेखित करण्यात आलं.यावेळी शरद पवार भावूक झाले.ज्या मराठवाडा विद्यापीठाचं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्यासाठी सत्तेवर पाणी सोडावं लागलं.त्याच विद्यापीठाने तब्बल 32 वर्षानंतर डी. लिट देऊन गौरव केल्याने शरद पवार अत्यंत भावूक झाले.
Previous Articleरेल्वे स्थानकाचा चेहरा आता बदलणार
Next Article मुंबई-पुणे मार्गावर रेल्वेचा ‘ब्रेक’
Related Posts
Add A Comment