मानवाच्या जनुकीय रचनेतील दोष काढून टाकल्यास त्याला कर्करोगासारख्या जीवघेण्या विकाराचा प्रादुर्भाव कधीच होणार नाही, असा निष्कर्ष एका महत्त्वपूर्ण संशोधनातून काढण्यात आला आहे. ही उपचारपद्धती जिनोमिक्स या शास्त्राrय नावाने ओळखली जात आहे. विशेषतः जे कर्करोग अनुवंशिक असतात, त्यांच्या विरोधात हे तंत्रज्ञान अतिशय प्रभावी ठरल्याचे दिसून येत आहे.

जिनोमिक्स ही नवी क्रांती मानली जात आहे. कर्करोगावरचा आतापर्यंतचा सर्वात प्रभावी उपाय अशी जिनोमिक्सची ख्यातीही बनली आहे. प्रत्येक रुग्णाची आवश्यकता स्वतंत्ररीत्या लक्षात घेऊन औषधे आणि इतर उपचार निर्धारित केले जातात. कर्करोग किंवा गाठींमध्ये कालक्रमानुसार होणारे परिवर्तनही लक्षात घेतले जाते. जितक्मया अचूक प्रमाणात हे निकष ठरविले जातील, तितकी ही उपचारपद्धती अधिक प्रभावी बनत जाते. जे कर्करोग बरे होत नाहीत असा समज आतापर्यंत होता, त्यावरही ही उपचारपद्धती प्रभावी ठरत आहे. कर्करोगाचा समूळ नायनाट केल्याखेरीज त्याची पुनरावृत्ती रोखणे अशक्मय असते. या उपचारपद्धतीतून कर्करोगाचा समूळ नायनाट होतो, असे सिद्ध झाल्याचे प्रतिपादन संशोधकांनी केले आहे. मानवी डीएनएमध्ये 80 हजार ते 1 लाख जिन्स असतात. डीएनएची रचना मुख्यतः अनुवंशिक असते. या अनुवंशिक रचनेत यांत्रिक प्रक्रियेच्या साहाय्याने तसेच औषधोपचारांच्या साहाय्याने मर्यादित परिवर्तन घडवून आणल्यास कॅन्सरची व्याधी पूर्णतः बरी होऊ शकते. येत्या काही वर्षात ही उपचारपद्धती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हालचाली करण्यात येत आहेत.