Mumbai News : राज ठाकरेंसोबतच्या (Raj Thackeray) आजच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या कौटुंबिक कार्यक्रमांना ते हजेरी लावतात तसा मी देखील त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावतो. पण आता भाजपचा अध्यक्ष झाल्यानंतर सदिच्छ भेट घेणं हे माझं काम आहे. अशा शब्दांत भेटीचं वर्णन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं. आज त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट कशासाठी होती याची उत्सुकता अनेकांनी होती. तसेच राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे. यावर स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.
यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले. ते म्हणाले, राज ठाकरे हे फायटर आहेत.मी वारंवार सांगतोय की राज ठाकरे हे महाराष्ट्रांच, जनतेचं आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारे एक अत्यंत प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांना मी याच दृष्टीकोनातून बघतो. यादृष्टीनेच मी त्यांची कौटुंबिक भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
Previous Articleसंभाजीनगरात एसटी बस खाली सापडून पादचारी ठार
Next Article बाप्पासाठी १० मिनिटांत बनवा रवा नारळ मोदक
Related Posts
Add A Comment