आईवडिलांन सेवेसाठी बोलाविले, आता देतात 6 लाखाचे पॅकेज
आमच्या देशात आईवडिलांच्या वाढत्या वयात त्यांची सेवा करणे हे त्यांच्या मुलामुलींचे कर्तव्य मानले जाते. याकरता त्यांना कुठलेच वेतन मिळत नाही, उलट ते स्वत:हून आईवडिलांची शक्य तितकी सेवा करत असतात. परंतु चीनमधील एका मुलीला तिचे आईवडिल घरात राहण्यासाठी दर महिन्याला पगार देत आहेत.

सोशल मीडियावर एका मुलीची कहाणी सध्या व्हायरल होत आहे. या मुलीने स्वत:च्या आईवडिलांच्या सेवेसाठी स्वत:ची नोकरी सोडली. परंतु आता ती स्वत:च्या वृद्ध आईवडिलांकडून याकरता पगार घेत आहे. मजेशीर बाब म्हणजे तिच्या पालकांनीच तिला ही ऑफर दिली आहे.
आमच्यासोबत रहा, पगार देऊ
40 वर्षीय महिला एका वृत्तसंस्थेत 15 वर्षांपासून काम करत होती. यामुळे तिला प्रचंड तणाव अन् 24 तास कॉलवर राहण्याची सवय झाली होती. हे पाहून तिच्या आईवडिलांनी तिला स्वत:ची नोकरी सोडण्याची आणि या बदल्यात तिच्या आर्थिक गरजांची काळजी घेऊ अशी ऑफर दिली.
‘पगार घेणारी’ मुलगी
महिलेने विचार केल्यावर ही ऑफर मान्य केली. तिच्या आईवडिलांची मासिक पेन्शन 12 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. यातील 47 हजार रुपये ते स्वत:च्या मुलीला घरी राहून सेवा करण्यासाठी देतात. आता मुलगी सकाळी एक तास आईवडिलांसोबत डान्स प्रॅक्टिस करते, तसेच त्यांच्यासोबत सामग्री खरेदीसाठी जाते. संध्याकाळी वडिलांसोबत मिळून स्वयंपाक करते. तसेच त्यांच्यासाठी ड्रायव्हिंग करण्यासह इलेक्ट्रॉनिकशी निगडित सर्व गोष्टींची काळजी घेते. महिन्यातून दोनवेळा तिघेही फॅमिली ट्रिपवर जातात. आता माझे जीवन अत्यंत आरामदायी झाल्याचे त्यांच्या मुलीचे म्हणणे आहे.