ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Chhagan Bhujbal and two were charged with threatening to kill a businessman चेंबूरमधील व्यापाऱ्याला मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह दोघांवर चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (2) आणि 34 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूरचे व्यापारी ललित टेकचंदानी यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे.
छगन भुजबळांनी मुंबईत समता परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना हिंदू धर्माविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यामुळे वादाला तोंड फुटलं होतं. हिंदू धर्माविरोधातील त्यांच्या वक्तव्याचे दोन व्हिडिओ फिर्यादी टेकचंदानी यांनी भुजबळांना पाठवले होते. व्हिडिओ पाठवल्यानंतर लगेचच टेकचंदानी यांना धमक्या देणारे व्हॉट्सऍप कॉल्स आणि मेसेज येऊ लागले. ”तू भुजबळ साहेबांना मेसेज केलास, तुला घरी येऊन गोळ्या घालू. तुला मागे दुबईची लोक पाठवू, साहेबांना मेसेज करणे तुला महागात पडेल,” अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचे टेकचंदानी यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अधिक वाचा : मला पेंग्विन म्हटल्याचा अभिमान : आदित्य ठाकरे
टेकचंदानी यांच्या फिर्यादीनंतर भुजबळ यांच्यासह दोघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (2) आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेकचंदानी यांनी त्याला आलेल्या मोबाईल नंबरची माहिती पोलिसांना दिली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.