पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे काल बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले असून शनिवारी तेथे होणाऱ्या निती आयोगाच्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर नव्या संसद भवनच्या उद्घाटनास उपस्थित राहण्याचीही शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीने मंत्रिमंडळ फेररचना होणार की काय ? याबाबत चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर निघाले आहेत. अचानक दिल्ली वारीचे कारण समजू शकले नाही. मुख्यमंत्री खासगी कामानिमित्त दिल्लीला गेल्याचे वृत्त आहे. मंत्रिमंडळाची फेररचना करण्याची गरज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. आपल्या दिल्ली दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. गोवा मंत्रिमंडळात दोघा मंत्र्यांचा समावेश करण्याबाबत ते पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. विधानसभा अधिवेशनाअगोदर मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ फेररचना करावयाची आहे. पक्षश्रेष्ठींनी अद्याप मान्यता दिलेली नसल्याने मंत्रिमंडळ फेररचनेचे घोडे अडून बसलेले आहे.
Previous Articleफर्मागुडीत साडेचौदा लाखाचा ड्रग्ज जप्त, दोघांना अटक
Next Article ‘ऑडिट’ न केल्यास निधी मिळणार नाही
Related Posts
Add A Comment