Chili Pepper Recipes : रोज भाजी काय बनवावी हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतोच. रोज सकाळी आणि संध्याकाळी रसभाजी आणि सुकी भाजी याचा बेत कसा आखावा याची चिंता प्रत्येकिलाच असते. त्यात घरातील प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असेल तर स्वयंपाक बनवणाऱ्या गृहिणीची कसरत होते. तुम्हाला गरम-गरम भाकरीसोबत मिरचीच्या भाजीचा बेत करायचा असेल तर ‘मिरचू’चा पर्याय तुम्हाला बेस्ट ठरेल. याला मिरचीची भाजी असेही म्हणतात. ति इतकी चवदार असते की तुम्हाला वेगळ काही करण्याची गरजचं नाही. कशी बनवायची ही मिरचू चला जाणून घेऊया.
साहित्य-
हिरवी मिरची- 20 ते 25
लसूण- 7 ते 8 कुड्या
जिरे-मोहरी-1-1 चमचा
हळद-1 चमच
शेंगदाणे कुट- 1 मोठा चमचा
कोथंबिर- पाव वाटी
मिठ- चवीनुसार
दही- चार चमचे
कृती
ताज्या हिरव्या मिरच्या घ्या. त्या स्वच्छ धुऊन घ्या. आता मिरचीचे बारीक तुकडे करून घ्या. आता मिरचीचे तुकडे तव्यावर भाजून घ्या. त्यानंतर मिरची साईटला करून त्यात एक चमचा तेल घाला. यानंतर मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडली की त्यात जिरे घाला . आता त्यात लसूण, हळद, शेंगदाणे बारीक कुट टाका हे मिश्रण भाजलेली मिरची मिक्स करून घ्या. कोथंबिर आणि चार चमचे दही घालून मिक्स करून घ्या. यात चवीनुसार मीठ घाला. गरम-गरम भाकरी सोबत सर्व्ह करा.
टीप- मिरची चिरत असताना त्याचे देट काढू नका. भाकरी सोबत खाताना देट दाताखाली आल्यावर चव येते.
Related Posts
Add A Comment