हेरगिरीसाठी वापर होत असल्याचा पेंटागॉनचा आरोप
वृत्तसंस्था/ मोंटाना
अमेरिकेच्या मोंटाना शहरात चीनचा संशयास्पद हेरगिरीयक्त बलून दिसून आला आहे. मोंटानामध्ये अमेरिकेच्या वायुतळाचा विशेष तळ असून तेथून आंतरखंडीय क्षेपणास्त्रs हाताळली जातात. पूर्ण अमेरिकेत अशाप्रकारचे केवळ तीनच वायुतळ आहेत. चीनचा हेरगिरी करणारा बलून मोंटाना शहरात दिसून आला आहे. अमेरिकेच्या संरक्षण हालचाली टिपण्यासाठी हा बलून पाठविण्यात आला असल्याचा दावा पेंटागॉनने केला आहे.
चीनचा हा बलून नागरी हवाई वाहतूक आणि आउटर स्पेसच्या खालून उड्डाण करत होता. अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांच्या चीन दौऱयाच्या पार्श्वभूमीवर हा बलून दिसून आला आहे. ब्लिंकेन हे 5-6 फेब्रुवारी रोजी चीनच्या दौऱयावर असणार आहेत. अमेरिकेच्या बलूनसंबंधीच्या दाव्याची पडताळणी करत आहोत असे चीनने म्हटले आहे.
मोबाइल टॉवरद्वारे हेरगिरी
चीनने यापूर्वी मोबाइल टॉवर्सवर हुवावेचे हेरगिरी उपकरण बसविण्याचा कट रचला होता, या उपकरणांच्या मदतीने अमेरिकेच्या सैन्यतळांची हेरगिरी करता येणार होती. बराक ओबामा यांच्या शासनकाळात ही उपकरणे जोडण्यास सुरुवात झाली होती. चीनने अमेरिकेच्या ग्रामीण भागांना लक्ष्य करत ही उपकरणे पेरली होती. चीन या उपकरणांना सैन्यतळांच्या दिशेने आणू लागल्यावर गुप्तचर यंत्रणांच्या नजरेत हा प्रकार आला होता. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी यावर त्वरित कारवाई केली होती. अमेरिकेच्या संसदेने ग्रामीण भागांमधून उपकरणे हटविण्यासाठी 2020 मध्ये 15 हजार कोटी रुपये मंजूर केले होते.

कॅनडामार्गे अमेरिकेत
चीनचा हा बलून काही दिवसांपूर्वी अलास्कानजीक अलेउतियन बेटानजीक पोहोचला होता. तेथून कॅनडामार्गे हा बलून मोंटाना शहरात पोहोचला आहे. या बलूनच्या हालचालींना टॅक करत असल्याचे कॅनडाच्या सरकारने म्हटले आहे. हा बलून अधिक काळापर्यंत देशात राहू शकतो, परंतु यापासून कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याचा धोका नाही. या बलूनचा ऍक्सेस मर्यादित असल्याने अधिक गोपनीय माहितीही मिळविता येणार नसल्याचे एका संरक्षण अधिकाऱयाने नमूद केले आहे.
अमेरिकेकडून वेट अँड वॉच
बलून नागरी हवाई वाहतुकीच्या कक्षेच्या वरून जात असल्याने तो नष्ट करण्याचा किंवा खाली पाडविण्याचा निर्णय आम्ही अद्याप घेतलेला नाही. अशाप्रकारची कारवाई केल्यास नागरिकांना नुकसान पोहोचू शकते असे पेंटागॉनच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.
चीनच्या अध्यक्षांची घेणार भेट
विदेशमंत्री ब्लिंकेन यांच्या दौऱयापूवी बलूनची घटना घडली आहे. अमेरिकेकडून याप्रकरणी चीनला इशारा दिला जाणार असल्याचे मानले जात ओह. तर दुसरीकडे 6 वर्षांमध्ये पहिल्यांदाच अमेरिकेचा विदेशमंत्री चीनच्या दौऱयावर जात आहे. ब्लिंकेन या दौऱयादरम्यान अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना भेटू शकतात.