तामिळनाडुतील प्रसिद्ध मंदिर, 5 लाख लोकांचा सहभाग
दक्षिण भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेल्या मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिराचे आकर्षण देशविदेशातील लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर आहे. तामिळनाडूच्या मदुराई येथील मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिरात चिथिराई थेरोट्टम (रथोत्सव) आयोजित करण्यात आला. या रथोत्सवात 5 लाख लोकांहून अधिक लोक सामील झाले. 12 दिवसीय वार्षिक चिथिराई ब्रह्मोत्सवामुळे आयोजित करण्यात आला. या उत्सवात 5 एप्रिल रोजी सुरुवात झाली आणि शनिवारी तो समाप्त झाला आहे.
रथोत्सवापूर्वी भगवान सुंदरेश्वर आणि देवी पिरियाविदाई यांच्यासाठी विशेष पूजा करण्यात आली. रथोत्सवादरम्यान 3500 हून अधिक पोलीस सुरक्षेसाठी तैनात होते.

लाकडाच्या छोटय़ा रथांमध्ये भगवान विनायक, भगवान मुरुगन आणि भगवान नयनमार्स यांच्या मूर्ती ठेवत हा उत्सव पार पडला आहे. तमिळ महिना चिथिराईमध्ये साजरा होणाऱया या रथोत्सवात राज्याच्या विविध भागांमधून भाविक पोहोचले होते. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून हा उत्सव भाविकांना अनुभवता आला नव्हता. परंतु यंदा पूर्ण धार्मिक उत्साह आणि उल्हासासह हा दिव्य कार्यक्रम पार पडला आहे.
चिथिराई ब्रह्मोत्सवादरम्यान भाविकांनी पूर्णपणे सजविण्यात आलेल्या लाकडी रथांना खेचून मोठय़ा उत्साहात यात भाग घेता. या रथांना खेचण्यासाठी देशविदेशातून मोठय़ा संख्येत भाविक पोहोचले होते.