काही व्यापाऱयांचा प्रताप : विपेते जीएसटी सरकारकडे जमा करत नसल्याने वादावादीचे प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील काही व्यापारी जीएसटी भरत नसल्यामुळे त्याचा फटका इतर नागरिकांना बसत आहे. खरेदी करताना ग्राहकांकडून जीएसटी वसूल केला जात असला तरी तो सरकारकडे जमा केला जात नाही. जे ग्राहक व्यापाऱयांकडे जीएसटी भरला का? असा तगादा लावतात, त्यावेळी जीएसटी भरला जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
सध्या कोणतीही वस्तू किंवा सेवा घेतल्यानंतर त्यावर जीएसटी भरावा लागतो. जे व्यापारी अथवा संस्था जीएसटी भरतात त्यांना सरकारकडून जीएसटी पुन्हा खात्यावर जमा होतो. परंतु शहरातील काही विपेते व व्यापारी वस्तू खरेदी केल्यानंतर जीएसटी वसूल करूनही तो सरकारकडे भरत नसल्याचे दिसून येत आहे. तो जीएसटी सरकारकडे जमा होणार नाही तोवर ग्राहकाला त्याचा फायदा मिळत नाही. जीएसटी सरकारकडे जमा न करणाऱया व्यापाऱयांकडे ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. बरेच उद्योजक, मोठे व्यापारी यांचे जीएसटी खाते असते. प्रत्येक खरेदीवर भरलेल्या जीएसटीचा काही भाग त्यांचा परतावा स्वरुपात पुन्हा मिळतो. परंतु विपेते जीएसटी सरकारकडे जमा करत नसल्याने वादावादीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कर चुकवेगिरी करणाऱया विपेत्यांवर आता सरकारकडून अंकुश ठेवावा लागणार आहे.