प्रतिनिधी /बेळगाव
बऱयाच वर्षांनंतर म्हटले तरी चालेल, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना एडीएलआर कार्यालयाची आठवण आली. त्याठिकाणी कसे कामकाज चाललेय याची पाहणी करण्यासाठी तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱयांनी अचानक भेट दिली. यावेळी त्या कार्यालयातील कर्मचाऱयांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी स्टोअररूम तसेच विविध विभागांची पाहणी करून जिल्हाधिकाऱयांनी एडीएलआर तसेच इतर कर्मचाऱयांना सूचना केली.
एडीएलआर कार्यालयामधून तातडीने कामे होत नाहीत, अशा तक्रारी वारंवार होत असतात. याचबरोबर सिटी सर्व्हे कार्यालयात अस्वच्छता तसेच अस्ताव्यस्तपणे कागदपत्रे पडलेली असतात. कामांसाठी ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे जनतेच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱयांनी मंगळवारी अचानक भेट दिली. यावेळी तहसीलदार आर. के. कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी एडीएलआर संदीप उप्पार यांनी जिल्हाधिकाऱयांना कामकाजाबाबतची माहिती दिली. याठिकाणी कोणकोणती कागदपत्रे मिळतात, तसेच किती रक्कम आकारली जाते, रक्कम कोठे भरली जाते, याची माहितीही देण्यात आली. जिल्हाधिकाऱयांनी अचानक भेट दिल्यामुळे निवांत असलेल्या कर्मचाऱयांची मात्र चांगलीच धांदल उडाली होती. एकूणच कामकाज योग्यरितीने तसेच जनतेला वेळेत सर्व कागदपत्रे उपलब्ध करा, अशी ताकीद त्यांनी यावेळी दिली.