बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले शहर प्रमुख सचिन वालावलकर यांना मातृशोक
Condolences to Vengurle City Chief Sachin Walawalkar of Balasaheb’s Shiv Sena Party
वेंगुर्ले कॅम्प-खाॅलगिरी येथील रहिवासी श्रीमती वासंती गुरुनाथ वालावलकर ( 80) यांचे शुक्रवार दि. 28 ऑक्टोंबर 2022 रोजी मुंबई येथे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, जावई, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
वेंगुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वेंगुर्ला शहर प्रमुख व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे खाजगी सचिव सचिन वालावलकर यांच्या त्या मातोश्री होत. तसेच लक्ष्मी नारायण महा ई सेवा केंद्र चालक सौ. समिक्षा सचिन वालावलकर यांच्या त्या सासूबाई होत. ठाणे येथील त्यांची मुलगी सौ. प्राची प्रदीप तिरोडकर यांच्या ए/९,३०४, वाल्मिकी सोसायटी यशस्वी नगर धाकोली रोड, ठाणे पश्चिम मुंबई येथील निवास स्थानावरून शुक्रवारी अंत्ययात्रा दुपारी 12.30 वाजता निघेल. माजीवडा स्मशानाभूमी ठाणे येथे अत्यं संस्कार होतील.
वेंगुर्ले (वार्ताहर)-