Kolhapur News : दोन आठवडय़ांपासून कोल्हापुरातील काही भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे अनेक रहिवाशांना उलट्या,जुलाब,चक्कर येणे असे प्रकार होत असून यात शिवाजी पेठ,साकोली कॉर्नर,निवृत्ती चौक परिसरात सर्वाधिक दूषित पाणी येत आहे. नळाला काळे पाणी येत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत विभाग कार्यालयात सामान्य नागरिक ते लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या तरी त्याची दखल गांभीर्याने घेतली जात नसल्याचे रहिवाशीयांनी सांगितले. दरम्यान महापालिका प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

दोन आठवडय़ांपासून शहरातील शिवाजी पेठ, साकोली कॉर्नर,निवृत्ती चौक परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. नळाला काळे पाणी येत असून त्यात अनेकदा सहज लक्षात न येणारे बारीक किडे तर अनेकदा गढूळ पाणी येत आहे. हे पाणी पिल्याने अनेकांना जुलाब-उलटय़ा होत असून अतिसार रोगी वाढत आहेत. याशिवाय बारीक डोकेदुखीने अनेकजण त्रस्त आहेत.