अनधिकृत टय़ूशनवर होणार कारवाई
बेळगाव/ प्रतिनिधी
खासगी शाळांप्रमाणेच आता खासगी टय़ूशन सेंटरचे प्रमाण झपाटय़ाने वाढू लागले आहे. आपली मुले शाळेत शिकली अथवा नाही शिकली तरी चालतील, परंतु टय़ूशनला मात्र गेलीच पाहिजे ही मानसिकता रूजत आहे. त्यामुळे आज गल्लीबोळात टय़ूशन क्लासेस सुरू आहेत. यामुळे शिक्षण विभागाचीही डोकेदुखी वाढली असून, यावर नियंत्रण आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
काही वर्षांपूर्वी दहावी, पीयुसी तसेच कॉलेज स्तरावरील शिक्षणासाठी खासगी टय़ूशन लावले जात होते. परंतु सध्या मात्र एलकेजी, यूकेजीपासूनच टय़ूशन लावले जात आहेत. यातील बरेचसे टय़ूशन हे बेकायदा घेतले जात असल्याचे समोर येत आहे. राज्यात 17 हजार 683 खासगी शाळा असून, त्यामध्ये 44.65 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मध्यंतरीच्या काळात ज्याप्रकारे खासगी शाळा सुरू करण्यात येत होत्या तशाच पद्धतीने आता टय़ूशन सुरू आहेत.
कर्नाटक शिक्षण कायदा 1983 नियम 35 अन्वये टय़ूशनची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील टय़ूशनसाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱयांची परवानगी असणे गरजेचे आहे. असे असताना प्रत्यक्षात मात्र कोणतीही परवानगी न घेता गल्लीबोळात टय़ूशन घेतले जात आहेत. याचा परिणाम भविष्यात शिक्षणाच्या दर्जाबरोबर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे यावर वेळीच निर्बंध आणणे गरजेचे आहे.
शिक्षणाधिकारी करणार चौकशी
टय़ूशनचे फॅड इतके वाढले आहे की, विद्यार्थी शाळेत गेला नाही तरी चालेल पण टय़ुशनला गेलाच पाहिजे, अशी मानसिकता होत आहे. त्यामुळे युकेजी-एलकेजीपासूनच विद्यार्थी टय़ूशनमध्ये दाखल होत आहेत. यावर निर्बंध आणण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱयांना नोंदणी न झालेल्या अनधिकृत टय़ूशनची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे बेळगाव शहरासह उपनगरांमधील बेकायदा टय़ूशन चालविणाऱयांचे धाबे दणाणले आहेत. तसेच टय़ूशनच्या फीबाबतही अनेक तक्रारी दाखल होत असल्याने शिक्षण विभागाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे.