लंडन / वृत्तसंस्था
ब्रिटनचे नवे राजे राजा चार्ल्स-तृतीय यांचा पुढील वषी राज्याभिषेक होईल. या सोहळय़ासाठी 6 मे 2023 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठीचा शाही सोहळा वेस्टमिन्स्टर ऍबे येथे होणार असल्याची माहिती बकिंगहॅम पॅलेसने बुधवारी दिली. ‘किंग चार्ल्स-3’चा राज्याभिषेक शनिवार 6 मे 2023 रोजी वेस्टमिन्स्टर ऍबे येथे होणार आहे’, असे राजघराण्याकडून करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
राजा चार्ल्स-3 यांच्यासह पत्नी कॅमिला यांचाही या समारंभात राज्याभिषेक होणार आहे. याआधी राणी एलिझाबेथ यांनाही जवळपास 16 महिने प्रतिक्षा करावी लागली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर फेब्रुवारी 1952 मध्ये त्या महाराणी बनल्या. परंतु जून 1953 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला होता.