वारंवार मागणी करूनही एल अँड टी कंपनी पाण्याच्या नव्या जोडण्या देत नसल्यामुळे अखेर नगरसेवक रवि साळुंखे यांनी स्वखर्चाने पाणी जोडणीची सोय केली. त्यामुळे लोकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक 27 मध्ये बसवाण गल्ली आणि पवार गल्ली याठिकाणी अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या होती. याबाबत नगरसेवक रवि साळुंखे यांनी एल अँड टी कंपनीकडे तक्रार केली होती. लोकांना नव्या जोडण्या देण्याची मागणी केली होती. पण कंपनीने नव्या जोडण्या देण्याचे काम बंद असल्याचे सांगितले. नगरसेवक साळुंखे यांनी त्यामुळे स्वखर्चाने जोडण्या खालून दिल्या. त्यासाठी एल अँड टी कंपनीने जुनी गाजलेली वाहिनी बदलून नवी वाहिनी घातली. पाणी समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक रवि साळुंखे यांनी घेतलेल्या पुढाकाराबाबत कौतुक करण्यात येत आहे.
Related Posts
Add A Comment