डोक्याला मार लागून झाला मृत्यू : दत्तगल्ली वडगाव येथील घटना
प्रतिनिधी / बेळगाव
दत्त गल्ली वडगाव येथील भंडारी यांच्या गच्चीवर झेप घेत असताना डोक्याला मार लागून मृत्युमुखी पडलेला वानर आजुबाजूच्या लोकांच्या निदर्शनास आला. इतक्यात कॉर्पोरशन वॉर्ड निरीक्षकांना नागरिकांनी माहिती दिली. लगेच शिल्पा कुंभार यांनी आपल्या सहकारी कामगारांना अंत्यविधीसाठी कळविले.
तसेच महानगर पालिका वार्ड नं. 28 चे निरीक्षक यांना हे समजले.निरीक्षक संजय पाटील यानी लगेच जोरात पाऊस पडत असताना आपल्या सहकाऱ्याना घेऊन बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर शिडी व दोरी लावून त्या मृत वानराला खाली काढले.
त्यानंतर हिन्दूरीती प्रमाणे समाज सेवक संजय पाटील, राजू शिगोली, मल्लेश संकन्नवर यांनी वडगांव येथे मृत वानरावर अंतिमसंस्कार केला.