बेकायदेशीर डोंगर कापणी प्रकरण
प्रतिनिधी /म्हापसा
पर्रा येथे सखल भागात बेकायदेशीररित्या मातीचा भराव टाकल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते मायकल लोबो व पत्नी आमदार डिलायला लोबो यांच्याविरुद्ध टीसीपी कायदा 17 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हापसा पोलिसांनी या प्रकरणी दोघांनाही समन्स बजावल्यानंतर आमदार डिलायला लोबो पोलीस स्थानकात कागदपत्रे सादर केली आहेत.
दोन दिवसांपूर्वीच विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांनी पत्रकार परिषद घेऊन बेकायदेशीर डोंगर कापणी प्रकरण दुसऱयाचे असल्याचे सांगून आपण आपल्या जागेत शेती करीत असल्याचे म्हटले होते. भाजप आपल्या विरोधात सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोपही केला होता.
म्हापसा पोलीस स्थानकात नगरनियोजन खात्याच्या अधिकारीवर्गांनी पर्रा येथील डोंगर कापणीची लेखी तक्रार मायकल लोबो व डिलायला लोबो यांच्या विरोधात दिली. त्यानंतर या तक्रारीची पडताळणी करून पोलिसांनी नगरनियोजन कायदा 17 (ब) अन्वे दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करून घेतला आहे.
बुधवार दि. 4 रोजी म्हापसा पोलीस स्थानकात या जागेची कागदपत्रे जमा करा असा समन्स दोघाही आमदारांना बजावल्यावर अखेर या प्रकरणी आमदार डिलायला लोबो म्हापसा पोलीस स्थानकात कागदपत्रे सादर केली आहेत.