दर अधिक असला तरी खरेदी जोमात
प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाला सुरुवात झाली की खवय्यांना आठवण होते ती खेकडय़ाच्या झणझणीत रश्श्याची. बेळगाव परिसरात उपलब्ध होणारा काळा खेकडा खरेदी करण्यासाठी खवय्यांची बाजारात झुंबड उडत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावषी दर अधिक असले तरी खरेदी मात्र जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील कॅम्प परिसरात खेकडय़ांचा बाजार भरतो. पावसाला सुरुवात झाली की या ठिकाणी खेकडे विक्री करणाऱया महिला दाखल होतात. हिडकल डॅम, गोकाक, घटप्रभा या परिसरातील नागरिक रात्रीच्यावेळी खेकडे पकडून सकाळी ते विक्रीसाठी बेळगावमध्ये घेऊन येतात. बेळगावकर खेकडय़ाचे खवय्ये असल्यामुळे पावसाळय़ाच्या दिवसात मोठी मागणी असते. आता हॉटेलांमध्येही खेकडा थाळी उपलब्ध होत असल्याने खेकडय़ांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.
मागील 15 दिवसांपासून कॅम्प येथील फिश मार्केटसमोरील रस्त्यावर खेकडय़ांची आवक होत आहे. आकारमानानुसार खेकडय़ांची विक्री करण्यात येत आहे. 50 रुपये जोडीपासून 150 रुपयेपर्यंत खेकडे विक्री होत आहेत. वर्षभर समुद्री खेकडे उपलब्ध असले तरी पावसाळय़ाच्या दिवसात काळा खेकडा खाण्याची एक वेगळीच चव असल्याने मोठी मागणी असते.
खरेदी करताना दक्षता गरजेची
खेकडे खरेदी करताना ग्राहकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. बऱयाचवेळा ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. दाखविताना चांगले खेकडे दाखवून देताना मात्र खराब खेकडे दिले जात असल्याने वादावादीचे प्रसंग घडत आहेत. दर ठरविताना एक दर तर पैसे घेताना अधिक दर सांगून विपेत्या महिला हुज्जत घालत असल्यामुळे खवय्यांनी नाराजीही व्यक्त केली. त्यामुळे खेकडे खरेदी करताना दक्षता घेणे गरजेचे आहे.