कॅनबेरा : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे वनडे संघाचे नेतृत्व सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व कमिन्सकडेच असल्याने आता त्याच्यावर ही दुहेरी जबाबदारी टाकण्यात आली आहे. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाचा ऍरॉन फिंचने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कसोटी कर्णधार पॅट कमिन्सकडे वनडे संघाचेही नेतृत्व सोपविले आहे. वनडे क्रिकेट प्रकारामध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासात संघाचे नेतृत्व करणारा पॅट कमिन्स हा पहिला वेगवान तर दुसरा गोलंदाज आहे. यापूर्वी दिवंगत फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने 1990 च्या दशकामध्ये 11 वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते. आयसीसीच्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन वनडे संघ अधिक बलवान बनविण्याची जबाबदारी पॅट कमिन्सवर राहणार आहे. लवकरच ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाच्या उपकर्णधारपदाची नियुक्ती केली जाईल. आयसीसीची आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासामध्ये पॅट कमिन्स हा वनडे संघाचा 27 वा कप्तान आहे. कर्णधारपदासाठी कमिन्स, स्टिव्ह स्मिथ, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरे आणि मॅक्सवेल यांच्यात चुरस होती पण कमिन्सने त्यांना मागे टाकत कर्णधारपद मिळवले.
Trending
- सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्य़ांवर कायदेशीर कारवाई; इंटरनेट काही काळासाठी बंद करणार; अफवांवर विश्वास ठेऊ नका
- संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या दोन दिवसांवर
- Kolhapur Breaking : कोल्हापूरातील परिस्थिती नियंत्रणात; पोलिसांचा अश्रुधुराचा वापर
- कोल्हापुरात वातावरण तंग ; संजय राऊत, अतुल भातखळकर, राजेश क्षीरसागर, मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया
- नियाजचे मालक नौशाद सौदागर यांचे निधन
- Sangli Breaking : इस्लामपुरात गुंडाचा गँगमध्ये सहभागी होत नसल्याने गेम
- डॉ. सुरेश गोसावी यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड
- कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर ; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली तोडफोड