प्राथमिक अहवालात नोंद, शवविच्छेदनात ‘व्हिसेरा प्रिझर्व्ह, ओपिनियन रिझर्व्ह’
प्रतिनिधी/ रत्नागिरी
ठाणे येथील सराफ व्यापारी कीर्तीकुमार अजयराज कोठारी यांचा मृत्यू श्वसनप्रक्रीया थांबल्याने झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात समोर आले आह़े तसेच कोठारी यांच्या मानेभोवती दोरीने आवळल्याच्या खुणा आढळून आल्या होत्य़ा असे असले तरी कोठारी यांचा खून करण्यात आल्याच्या दिवशी त्यांच्यावर विषप्रयोग, अथवा गुंगीचे औषध देण्यात आले हेते का? याची तपासणी होणे गरजेचे आह़े यासाठी शवविच्छेदन अहवालात ‘व्हिसेरा प्रिझर्व्ह ओपिनियन रिझर्व्ह’ नमूद करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आह़े
गुरुवार, 22 सप्टेंबर रोजी कोठारी यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होत़ा याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱयांकडून शवविच्छेदन करण्यात आले होत़े कोठारी यांचा मृतदेह पाण्यामध्ये राहिल्याने शरीरावरील चामडी निघाल्याचे दिसून आल़े तसेच कोठारींच्या गळय़ाभोवती दोरीने आवळल्याच्या खुणा देखील दिसून आल्या होत्य़ा श्वसनक्रिया बंद पडणे व गळ्याभोवती असलेल्या दोरीच्या खुणा यामुळे कोठारी यांचा मृत्यू गळा आवळून करण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट होत आह़े
रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी आलेले किर्तीकुमार कोठारी यांचा 19 सप्टेंबर रोजी शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होत़ा आर्थिक व्यवहारातून हा खून करण्यात आला आल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये समोर आले आह़े याप्रकरणी पोलिसांनी त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण सुभाष खेडेकर (42, ऱा खालची आळी रत्नागिरी), रिक्षा चालक महेश मंगलप्रसाद चौगुले (39, ऱा मांडवी सदानंदवाडी रत्नागिरी) व फरीद महामूद होडेकर (36, ऱा भाटे खोतवाडी) यांना अटक केली आह़े
कोठारी यांचा खून केल्यानंतर 19 सप्टेंबर रोजी तिनही संशयितांनी मृतदेह एका मोठय़ा गोणीमध्ये भरल़ा यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास महेश चौगुले याच्या रिक्षात हा मृतदेह भरण्यात आला होत़ा तसेच मृतदेह आबलोलीतील जंगलमय परिसरात असलेल्या पऱयामध्ये संशयितांनी फेकून दिल़ा 22 सप्टेंबर रोजी संशयित आरोपी यांना ताब्यात घेतल्यानंतर मृतदेह पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल़ा तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आल़े
संशयित आरोपी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये दोरीने गळा आवळून खून केल्याचे सांगितले आह़े असे असले तरी शवविच्छेदन अहवालात त्याला पुष्टी मिळणे अत्यंत गरजेचे मानले जात़े त्याअनुषंगाने पोलिसांकडून पुरावे गोळा करण्यात येत असतात़ दरम्यान व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आह़े या अहवालानंतर अंतिम शवविच्छेदन अहवाल तयार करण्यात येईल असी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आह़े
शवविच्छेदनाचे व्हिडीओ शुटींग
22 सप्टेंबर रोजी कोठारी यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालय याठिकाणी आणण्यात आला होत़ा याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱयांकडून शवविच्छेदन करण्यात आल़े कोठारी हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याने व त्यांच्याबाबत खुनासारखी गंभीर घटना झाल्याने शवविच्छेदनाचे व्हिडीओ शुटींग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.