ऑनलाईन टीम/ तरुण भारत
मुंबई : पक्ष नेतृत्वाला चुकीचे सल्ले देणाऱ्यांनीच शिवसेनेचं नुकसान केलं. अनेक गोष्टी संजय राऊतांना माहित नसतात. ते स्वत:ला खूप जवळचे समजतात अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली. संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला होता त्याला त्यांनी प्रत्यूत्तर दिले. आज माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. (Deepak Kesarkar React to Sanjay Raut Allegation)
हेही वाचा-बालेकिल्ल्यात शिवसैनिकांची नव्याने मोट बांधण्याचे आव्हान
यावेळी बोलताना ते म्हणाले, आधी जखम द्यायची आणि नंतर मलम लावण्याचा सल्ला देणाऱ्यांनीच शिवसेनेचं नुकसान केलं. सुरवातीला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गटनेते पदावरून काढलं. त्यानंतर तुम्ही नार्वेकरांना पाठवलं. तसेच खासदार भावना गवळी यांना कार्यकरणीतून काढण्यावर आक्षेप घेत त्यांनी तुमचा झेंडा पाचवेळा उंचावल्याचं म्हटलं.
हेही वाचा- पालकमंत्रीपद गेल्यानंतरही सतेज पाटील महापूराला तोंड देण्यास सज्ज; दिल्या ह्या सुचना
२०१९ ला अनेकजण माझ्याकडे येऊन लोटांगण घालत होते. सरकार स्थापन झालं, त्यावेळी तुम्ही का नाही बोललात, असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना केसरकर म्हणाले , राऊत उद्धव ठाकरेंवर किती प्रेम करतात हे माहित नाही. शिवाय उद्धव ठाकरे यांचं मन वळविण्यासाठी चार ते पाच महिन्यांपूर्वीच त्यांनी प्रयत्न केले होते. अनेक गोष्टी त्यांना महित नसतात. ते स्वत:ला खूप जवळचे समजतात. पण तसं नाही. तर ते शरद पवारांच्या जवळचे आहेत असेही केसरकरांनी सांगितलं.