बेळगाव प्रतिनिधी – कामगारांच्या मुलांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र अद्याप विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्यात आले नाहीत. कामगारांना देण्यात येणारे कीट ही आमदार स्वतःकडे ठेवून घेत आहेत. त्या किट बद्दल आता कामगारांच्या खात्यात थेट रक्कम जमा करावी यासह इतर मागण्यासाठी जिल्हा कामगार संघटना आणि विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वेळेत दिली जात नाही, बांधकाम कामगारांना घरांसाठी पाच लाख रुपये देण्याची योजना आहे, मात्र अजून एकाही कामगाराला घरबांधणीसाठी पैसे दिले नाहीत. त्यामुळे या सर्व योजना तातडीने लागू कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष ॲड. एन.आर. लातूर , भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुजित मुळगुंद, सुनील गावडे, ॲड. विष्णू लातूर, नारायण पाटील, ॲड. यशवंत लमानी, ॲड. विनोद पाटील, ॲड. रोहित लातूर, रामदास चौगुले, मोहन पवार, लक्ष्मण गडगाने, शिवाजी पाटील, शिवाजी बोकमूरकर यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित हो
Previous Articleबँक लुटीतील 55 लाखांचा ऐवज जप्त
Next Article खुसखुशीत आणि स्वादिष्ट मटार कचोरी
Related Posts
Add A Comment