Devendra Fadnavis News: सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात जमिनी उपलब्ध करून सौरऊर्जा प्रकल्प आणण्याचा मानस आहे.शेतकऱ्यांचे अवकाळी पावसात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत पोहचवली आहे. ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही त्याची माहिती घेवून 15 दिवसात मदत पोहचवणार आहे.जलयुक्त शिवार या योजनेचा देखील आढावा घेतल्याचे फडणवीसांनी सांगितले. 167 गावांमध्ये जलयुक्त शिवार 2 ची कामं सुरु करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.यावेळी विविध विकासकामांचं फडणवीसांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विरोधकांवरही त्यांनी टिका केली.
अरविंद केजरीवाल यांनी काल उध्दव ठाकरेंची भेट घेतली. आज ते शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले,मला अतिशय आनंद होत आहे. ज्या केजरीवालांनी शरद पवार यांच्याविषयी असे-असे शब्द वापरले आहेत की, मी ते वापरू शकत नाही.त्याची व्हिडिओ क्लीप व्हायरल होत आहे.उध्दव ठाकरे आणि शिवसेनेविषयी केजरीवाल काय बोलले आणि ठाकरे केजरीवाल यांच्याविषयी काय बोलले हे सगळ्यांना माहित आहे.मोदींना विरोध करण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मोदींच्यावर जनतेचा विश्वास आहे. मला येथे आवर्जून सांगायचे आहे. मोदी परदेश दौरा करून आले. भारताचा मान-सन्मान काय आहे, हे परदेश दौऱ्यात आपण पाहिलं आहे. पापुआ न्यू गिनी याठिकाणी त्यांचं स्वागत झालं, एवढचं नाही त्यांना त्या देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाला.ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी त्यांना बॉस म्हटलं.अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी मोदींची सही घेण्याची इच्छा दाखवली.मोदींचे कार्यक्रम घेतले तर पासेस कसे द्यायचे असा प्रश्न आमच्यासमोर तयार होतो.परदेशात ज्या पध्दतीने मोदींच कौतुक, स्वागत केलं जातयं ते पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय.त्यांच्या कितीही पोटात दुखलं तरी मोदी वैश्विक नेते झाले असल्याचे फडणवीस म्हणाले.
Previous Articleमी खासदारकीची निवडणूक लढवणार -मंत्री केसरकर
Next Article आरोस विद्या विहार मधून समिधा कांबळी प्रथम
Related Posts
Add A Comment