सोशल मिडीयावर संत बागेश्वर महाराज अलियास धिरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्या कार्यक्रमावर महाराष्ट्रात (Mahrashtra) बंदी घालावी आणि मिरा रोडवर होणारा कार्यक्रमावर राज्य शासनाने कारवाई करावी अशी मागणी कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या धिरेंद्र शास्त्रींना राज्य सरकार का संरक्षण देत आहे असा सवालही केला.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, “धिरेंग्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला कॉंग्रेसचा विरोध आहे. या विरोधामध्ये एवढंच महत्वाच आहे की, कुठल्या महाराजांनी काय सांगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण बागेश्वर धामच्या धिरेंद्र शास्त्री यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अपमान केला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर ही राज्य सरकार गप्प का बसले आहे ? त्याच्यावर कोणतीच कारवाई का केली गेली नाही ? महाराष्ट्रातील संत परंपरेचे एव्हढे महत्व आहे की, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मांडत असताना वित्तमंत्र्यांनी संत तुकाराम महाराज्यांच्या ओवी म्हणत अर्थसंकल्प मांडला. यावरून त्यांच्या विचारामध्ये किती ताकत आहे हे दिसून येते. त्यामुळे भ्रष्ट विचारांचा महाराज स्वत:ला मोठा संत म्हणत असेल तर हे चुकीचे आहे. त्यामुळे राज्यसरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे.” असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले.
काही दिवसापुर्वी नागपूरमध्ये झालेल्या आपल्या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांना त्यांच्या पत्नीकडून वाईट वागणूक मिळायची असे वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना रोषाला सामोरे जावे लागले होते.
Related Posts
Add A Comment