शिवसंस्कृती प्रतिष्ठान ढोल ताशा पथक, गोवा यांनी गाजविले मैदान
प्रतिनिधी / बेळगाव : येथील सरदार मैदानावर उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दसरा क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. त्याअंतर्गत ढोल ताशा स्पर्धा दि ७ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत शिवसंस्कृती प्रतिष्ठान ढोल ताशा पथक, गोवा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला असून द्वितीय क्रमांक आरंभ ढोल – ताशा पथक बेळगाव, तृतीय क्रमांक शिवगर्जना ढोल ताशा पथक बेळगाव, चौथा क्रमांक, मोरया ढोल ताशा पथक बेळगाव, पाचवा क्रमांक वैजनाथ ढोल ताशा पथक बेळगाव यांनी मिळविला आहे. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा यासह इतर ठिकाणाहून स्पर्धकांनी सहभाग घेतला. तसेच मोठ्या प्रमाणात प्रेक्षक ही स्पर्धा पाहण्यासाठी आले होते. त्यामुळे उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली.

