ऑनलाईन टीम/तरुण भारत
वाढत्या महागाईने श्रीलंकेतील सामान्य नागरिक भरडला गेला असून त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात त्यांना आंदोलनाचे हत्यार उगारावे लागले. नवीन राष्ट्रपती आणि पंतप्रधानाची निवड होऊनही श्रीलंकेतील जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. दरम्यान, राष्ट्रपती म्हणून विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी शपथ घेतली. तर श्रीलंकेचे पंतप्रधान पद रिक्त होते. त्यानंतर आता दिनेश गुणवर्धने (Dinesh Gunawardena) यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे.
श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी ज्येष्ठ राजकीय नेते दिनेश गुणवर्धने विराजमान झाले झाले आहे. त्यांनी आज कोलंबोमधील फ्लॉवर रोडवरील पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तर रानिल विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकरला आहे. दरम्यान आज दिनेश गुणवर्धने यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली आहेत.
हे ही वाचा : डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर
श्रीलंकेच्या राजकारणातील एक अनुभव व्यक्ती म्हणून गुणवर्धने यांच्याकडे पाहिले जाते. यापूर्वी एप्रिलमध्ये श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांच्या कार्यकाळात गुणवर्धने यांना गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच त्यांनी परराष्ट्र मंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणून देखील कार्यभार सांभाळला आहे. मात्र विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्याने श्रीलंकेचे पंतप्रधान पद रिक्त होते. त्यानंतर आता दिनश गुणवर्धने यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे.