ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकत्र येणार असून, वानखेडे स्टेडिअमवर त्यांची भेट होणार आहे. मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या डिनर डिप्लोमसीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
एमसीएची 20 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वानखेडे मैदानावर डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलं आहे. याला निवडणुकीतील राजकीय विरोधक एकत्र येणार आहेत.
अधिक वाचा : मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष
या तिन्ही नेत्यांमध्ये होणारी भेट ही केवळ एमसीए निवडणुकीसंदर्भात आहे. त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा नसेल. अमोल काळे यांचा विजय निश्चित करण्यासाठी हे तिन्ही नेते भेटणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. बैठकीनंतर हे नेते स्पर्धकांसोबत नावखेडे स्टेडिअमच्या गरवारे क्लबमध्ये जेवणाचा अस्वाद घेणार आहेत.